Uncategorized
Trending

होळी सणा वेळी बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्याला अटक

बेलगाम प्राईड/ होळी सणाच्या पार्श्वभूमीवर दारूबंदी असतानाही बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या आरोपीला अबकारी विभागाच्या पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून लाखो रुपयांची दारू जप्त केली आहे.

तालुक्यातील मुत्नाळ गावचा युवक अरुण राजू वाघमारे (वय २१) अटक करण्यात आलेला आरोपी आहे. होळी सणानिमित्त जिल्ह्यात दारू विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. या संधीचा फायदा घेत आरोपीने सणात मोठा नफा कमविण्याच्या उद्देशाने मुत्नाळ गावाबाहेरील शेडमध्ये गोवा राज्यातील विविध प्रकारची दारू व बिअरचे बॉक्स साठवून ठेवले होते.

अबकारी विभागाचे अधिकारी हलगा गावाच्या हद्दीत गस्त घालत असताना हिरेबागेवाडी-मुत्नाळ गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील शेडमध्ये बेकायदेशीर दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. बेळगाव अबकारी विभागाचे आरोपीकडून ३,७७,५०० रुपये किमतीची ५५३.९६ लिटर गोवा राज्यातीलमद्य व २३.४० लिटर बिअर जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

अबकारी अपर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, संयुक्त आयुक्त एफ. एच. चलवादी, उपआयुक्त जगदीश कुलकर्णी (बेळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप अधीक्षक रवी एम. मुरगोड यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक दुंडप्पा हक्की व कर्मचारी सुनील पाटील यांनी ही कारवाई करून बेकायदेशीर दारू विक्री प्रकरण उघडकीस आणले. त्या दारू विक्री करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करून त्याला कारागृहात डांबण्यात आले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!