Uncategorized
Trending

टिळकवाडी येथील चोरी प्रकरणात महिलेला अटक 32 लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त

बेलगाम प्राईड/ टिळकवाडी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कोस्टल एम्पायर लॉजिंग आणि अमित डिलक्स लॉजिंग येथे झालेल्या चोरीच्या प्रकरणातील महिला आरोपी अटकेत.

बेलगाव शहरातील टिळकवाडी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कोस्टल एम्पायर लॉजिंग व अमित डिलक्स लॉजिंग येथे चोरी झाल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तक्रारी वरून माननीय पोलीस आयुक्त बेलगाव शहर, माननीय उप-पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), माननीय उप-पोलीस आयुक्त (गुन्हे व प्रशासन) बेलगाव शहर तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त, खडेबाजार उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने आरोपी श्रीमती दीपा महालिंग अवटगी, (वय 33) व्यवसाय: फॅशन डिझायनर, रा. करिसिद्देश्वर गल्ली महालिंगपूर, जि. बागलकोट, सध्या रा. एस.डी.व्ही.एस. कॉलेज समोर, संकेश्वर, ता. हुक्केरी, जि. बेलगाव हिला अटक केली आहे.

तिच्याकडून खाली देण्यात आलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

11 मोबाईल फोन – अंदाजे किंमत ₹66,000/- काळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा (AKY) टॅब – ₹5,000/- एअरटेल माय वायफाय डोंगल – ₹1,000/- तीन कारच्या किल्ल्या – रोख रक्कम – ₹14,000/-पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर कार क्रमांक KA-04-MZ-6552 – ₹25,00,000/-पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी एस-क्रॉस (नेक्सा) कार क्रमांक MH-09-EU-7121, चॅसिस नं. MA3FNEB1S00201121, इंजिन नं. D13A-5670758 – ₹7,00,000/- असा एकूण ₹32,86,000/- किमतीचा माल जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे.

या प्रकरणातील दुसरा आरोपी शिवानंद, विनोद शंकरय्या मठपती, रा. शंकरनगर, संकेश्वर, निपाणी रोड, ता. हुक्केरी, जि. बेलगाव हा फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

या तपास पथकात टिळकवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी, पीएसआय विश्वनाथ घंटामठ (कायदा व सुव्यवस्था), प्रभाकर डोळी पीएसआय (गुन्हे) तसेच कर्मचारी महेश पाटील, एस.एम. करलिंगण्णावर, नागेंद्र तळवार, सतीश गिरी, लाडजिसाब मुलतानी, गंगव्वा पार्वती आणि तांत्रिक विभागाची कर्मचारी रमेश अक्की, महादेव खासीद यांनी काम केले आहे.

त्यांच्या या कार्याबद्दल पोलीस आयुक्त, बेलगाव शहर यांनी कौतुक करून त्यांना बक्षीस जाहीर केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!