बेकायदेशीर शस्त्रास्त्रे उघडपणे घेऊन फिरणाऱ्या तिघांना अटक

बेलगाम प्राईड /बेळगाव शहरातील चाकू हल्ल्यांच्या वाढत्या प्रकरणांवरून पोलिसांनी शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या दोन विविध पोलीस ठाणकामध्ये तिघांना ताब्यात घेऊन अटक केल्याची कारवाई मार्केट आणि टिळकवाडी पोलिसांनी केली आहे.
दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. २० जुलै रोजी मार्केट पोलिस स्टेशनचे पीएसआय विठ्ठल हवन्नवर हे इंदिरा कॅन्टीन जुन्या भाजी मार्केटजवळ संशयित व्यक्तींची तपासणी करतेवेळी या कारवाई दरम्यान, पोलिसांनी सलमान मोहम्मद. हरशद दलायत (वय ३५), रा. आरळीकट्टी देशपांडे गल्ली, बेळगाव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक बेकायदेशीर धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे.

याचप्रमाणे टिळकवाडी पोलिस स्टेशनचे पीएसआय पी.जी. डॉली, हे देखील गस्तीवर असते वेळी यरमाळ येथे एका राखाडी रंगाच्या हिरो मोटरसायकलवरून जात असलेल्या दोन तरुणांना संशयाने तपासणी केली असता त्यांच्याकडे २९ इंच लांब आणि २ इंच रुंद अशी लोखंडी तलवार आढळून आल्याने ती जप्त करण्यात आली या घटनेत राकेश मल्लप्पा भंगी (वय १८) रा. मारुती गल्ली, यरमाळ संतोष तातप्पा (वय १९) रा. मारुती गल्ली, यरमाळ अशी या दोघांची नावे असून यांना पोलिसांनी अटक करण्यात आली त्यांची किंमत अंदाजे ३०,००० रुपये इतकी आहे. पोलिसांनी तलवार आणि मोटरसायकल असे दोन्ही जप्त करण्यात आले असून आरोपींचा पुढील तपास सुरु केला आहे.




