Uncategorized
Trending

पोलिसांचे गांजा धाडीच्या मोहीमे बरोबर चोरीप्रकरणातील आरोपींना अटक

बेलगाम प्राईड / बेळगाव शहर पोलिसांनी गांजा आणि मादक पदार्थांची अवैध विक्री व सेवन करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याचबरोबर हिरेबागेवाडी पोलिसांनी एका इलेक्ट्रिकल दुकानातील चोरीचाही तपास यशस्वीपणे लावला आहे.

२३ जुलै २०२५ रोजी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बडस के.एच. गावाजवळ जिओ पेट्रोल पंपसमोर सार्वजनिक रस्त्यावर गांजा विकणाऱ्या मनसूर अप्पालाला मकानदार (वय ४२) रा. पारिशवाड, ता. खानापूर) याला पोलीस निरीक्षक सुंदरेश के. होळेण्णावर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा २.०६५ किलो गांजा, ५ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन, ४० हजार रुपये किमतीची टीव्हीएस एन-टॉर्क स्कूटर आणि १०० रुपयांची प्लास्टिक झिप कव्हर्ससह ७५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात एकूण ९५,८५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

त्याच दिवशी, २३ जुलै २०२५ रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याचे पीएसआय एस. आर. मुत्तट्टी आणि त्यांच्या पथकाने गस्तीवर असताना, कंग्राळी के.एच. ज्‍योती नगर क्रॉसजवळ सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या सुदेश दशरथ बोस (वय २६) रा. ज्‍योती नगर, कंग्राळी के.एच., बेळगाव) याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध एपीएमसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

शहापूर पोलीस ठाण्यातील पथकाने वडगाव मुख्य रस्त्यावरील सोनार गल्ली क्रॉसजवळ सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या बाबासाहेब सोपान पाडईकर (वय ४७) रा. नंदुर्की, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, महाराष्ट्र) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.

तसेच हिरेबागेवाडी पोलिसांनी एका इलेक्ट्रिकल दुकानातील चोरीचाही यशस्वीपणे लावला आहे. पोलीस आयुक्त, बेळगाव शहर आणि एसीपी, बेळगाव ग्रामीण उपविभागाचे बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. के. होळेण्णावर यांच्या नेतृत्वाखालील पथक आणि पीएसआय बी. के. मिटगार व त्यांच्या सहकाऱ्यांनी २३ जुलै २०२५ रोजी संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या मल्लिक खलील हुबळी (वय २८, रा. किल्ला, शिवाजी नगर, बेळगाव) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. त्याच्या जवळून जी.एम. कंपनीचे ७५ वायर बंडल्स आणि फिनोलेक्स कंपनीचे १५ वायर बंडल्स, असे एकूण १ लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच, गुन्ह्यात वापरलेली २ लाख ८० हजार रुपये किमतीची बजाज मॅग्निमा ऑटोरिक्षा आणि १ मेटल शीट कटरही जप्त करण्यात आले. एकूण ३ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या सर्व यशस्वी कारवायांबद्दल पोलीस आयुक्त, बेळगाव शहर आणि डीसीपी यांनी संबंधित पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, पीएसआय आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!