Uncategorized
मनगुती शिवमूर्ती विटंबना पुढील सुनावणी १२ ऑगस्ट

बेलगाम प्राईड /मणगुत्ती ता.हुक्केरी येथे शिवपुतळा उभारणी करण्यासाठी शिवप्रेमींनी आवाज उठवला होता, त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. शिवप्रेमींचा उद्रेक होऊन पोलिसांनी त्यांना चौथऱ्याजवळ जाण्यास मज्जाव केला होता,
या प्रकरणात महाराष्ट्रातील मराठा नेते दिनेश कदम यांच्यावर यमकनमर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता, याची सुनावणी संकेश्वर सत्र न्यायालयात सुरू असून आज दिनांक 31 जुलै रोजी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली, याची पुढील सुनावणी 12 ऑगस्ट रोजी होणार आहे.
आज सुनावणी दरम्यान दिनेश कदम,युवा समितीचे सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके हजर होते. वकील महेश बिर्जे व वकील रिचमन रिकी हे काम पाहात आहेत.




