Uncategorized
Trending

त्वरित युरिया वितरित करा; शेतकऱ्यांची मागणी डीसी कार्यालयासमोर निदर्शने

बेलगाम प्राईड / बेळगाव सह ग्रामीण भागामध्ये शासनाकडून त्वरित युरिया वितरित करा अशी मागणी रयत संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे केली मागणी

2025 च्या खरिप हंगामात शेतकऱ्यांनी शेतीची चांगली मशागतही केली नव्हती. त्यातच मे महिन्यापासून मोठा अवकाळी पाऊस सुरु झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबडीने खरिप पेरणी केली. त्यावर अतिवृष्टी झाल्याने शेतीत पाणी साचले आणी पाणी-मुळका एक झाला. जमीनीत थंडपणा वाढल्याने अनेक शेतकऱ्यांची पीके नष्ट झाली तर बळळारीनाला परिसरातील शेतकरी तर पूरताच संपला गेला

पावसाने जमीनीचा भाग खराब झाल्याने पीकांची वाढ खुंटली. त्यावर युरिया शिंपडल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्यायच नव्हता. पण युरिया मिळणे कठिण झाले. त्यात सरकारच्या लिंक योजनेमूळे आधिच पिचलेल्या शेतकऱ्यांना जादा भूर्दंड बसला. हजारो शेतकऱ्यांना अजूनही युरिया मिळाले नसल्याने त्यांची घालमेल होत कष्ट करुन पेरलेली पीकं खराब होतील का याची मोठी चिंता लागून आहे.

अनेक शेतकऱ्यांची पेरणी केलेली बियाणं नष्ट झाली आता दुसऱ्यांदा लावणी करावी लागत आहे. त्यासाठीही जमीनीतील नत्र (नायट्रोजन) संतूलीत राखन अत्यंत गरजेचे आहे. असे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

शेतकरी पीकांची वाढ होण्यासाठी युरियाचा वापर करतात व त्यानंतर इतर गोळीखतंही वापरतात. अनेक शेतकरी शेणखतं यसेच सेंद्रिय खताचाही वापर सर्रास करतात. पण यावेळी ऐनवेळेला अतिवृष्टी झाल्याने. त्याचा म्हणावातसा उपयोग झाला नाही. त्यासाठी आता शेतकऱ्यांना युरियाची अत्यंत गरज आहे. तेंव्हा ताबडतोब बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना युरियाचे वितरण करुन सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत लिंक विरहित पुरवठा करुन खटलेल्याला आधार द्यावा अशी मागणी केली आहे.

जर का प्रशासनाने तात्काळ युरिया उपलब्ध न केल्यास उग्रआंदोलन करुन सरकारला जागे केल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा रयत संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी शेतकरी नेते राजू मर्वे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!