
बेलगाम प्राईड/ शिमोगा येथील ए.झेड मार्शलआट्स अकॅडमीच्यावतीने आयोजित कराटे स्पर्धेमध्ये इंडियन कराटे क्लब बेळगांवच्या कराटेपटूंनी सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले आहे.
शिमोगा येथील नेहरु इनडोअर क्रीडांगणावर झालेल्या स्पर्धेत 900 कराटेपटू सहभागी झाले होते. इंडीयन कराटे क्लब बेळगाव कुडची शाखेच्या कराटेपटूंनी कुमिते आणि काता या प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करीत 8 पदके जिंकली. पदक विजेत्या कराटेपटूंमध्ये
गगन देसाई (रौप्य पदक, कांस्य पदक), प्रितम खणावर (सुवर्ण पदक, रौप्य पदक) समर्थ बडीगेर (रौप्यपदक, कांस्य पदक), रीत्वी हुलमनी (कांस्य पदक, कांस्य पदक). या यशस्वी कराटेपटूंना कराटे प्रशिक्षक लक्ष्मीकांत आनंदाचे आणि बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गंजेंद्र बी. काकतीकर यांचा मार्गदर्शन लाभत आहे.




