
बेलगाम प्राईड / बेळगावहून सांबरा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेळगावच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या पथकाने सांबरा रस्ता व करडीगुद्दी वळणाच्या ठिकाणी अलीकडेच तपासणी करून आपल्या शिफारसीचा आराखडा तयार केल्या आहे.
केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जीआयटी) बेळगावच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या पथकाकडून गेल्या 29 जुलै 2025 रोजी मारिहाळ पोलिस स्थानकाच्या हद्दीतील करडीगुद्दी क्षितिजसमांतर आडव्या वळणावरिल विभागाची तपासणी करण्यात आली. या तपासणी पथकात केएलएस जीआयटीच्या अभियंता विभागाच्या प्रा. अर्चना शगोटी, प्रा. सोमनाथ खोत आणि प्रा. शशांक सी. बांगी यांचा समावेश होता. मारिहाळ पोलिस प्रतिनिधींसोबत केलेल्या या तपासणीदरम्यान वारंवार अपघात होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणाकडची पुढील निरीक्षणे आणि टिप्पण्या करण्यात आल्या आहेत.
1) असे आढळून आले की आडव्या वळणाच्या अगदी बाजूला, आणखीन एखादा रोड आहे. धोक्याची दिशा दाखवणारा बोर्डसह सावधगिरीचा लाईट चुकीच्या पद्धतीने लावलेला आहे. वळणाच्या दोन्ही बाजूंना धोक्याचे इशारे असणारे स्टिकर्स किंवा पट्ट्या लावण्यात आलेले नाहीत. रस्त्याच्या खुणा जीर्ण झाल्या आहेत आणि उंच फुटपाथला मार्कर नाहीत (आरपीएम), कॅट्स आय/रोड स्टड आणि ट्रॅफिक डिलीनेटर बसवलेले नाहीत. 2) गार्ड रेल झाडांनी झाकलेले असल्यामुळे घाट विभागातून येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाहीत. वक्राच्या दोन्ही बाजूला सावधानतेचे फलक नाहीत. 3) वळणावर 50 कि.मी. प्रतितास वेगाने जाण्यासाठी किमान त्रिज्या 80 मीटर हवी, तर साइटवर उपलब्ध त्रिज्या 36.34 मीटर आहे. सध्याच्या वळणाच्या परिस्थितीनुसार शिफारसी: 1) संपूर्ण उतरत्या भूभागावर वेग 30 कि.मी. प्रतितास मर्यादित असावा आणि एमओआरटी अँड एचच्या निर्देशांनुसार योग्य फलक बसवले पाहिजेत.
2) घाटाच्या दिशेने तोंड करून फ्लॅशिंग लाईट्स बसवण्याची सूचना, जेणेकरून खाली जाताना वेग कमी होईल. 3) वळण वक्राच्या संपूर्ण लांबीवर रस्त्याच्या खुणा आणि उंचावलेले पेव्हमेंट मार्कर (आरपीएम), कॅट्स आय/रोड स्टड आणि ट्रॅफिक डिलीनेटर बसवले पाहिजेत. 4) वळणावर अतिवेग कमी करण्यासाठी वळणाच्या दोन्ही बाजूंना रंबल स्ट्रिप्सची मालिका घालणे आवश्यक आहे.
जीआयटीच्या पथकाने मारिहाळ पोलिस स्थानकाच्या हद्दीतील सांबरा विमानतळ प्रवेश रस्त्याच्या अगदी अलीकडे असलेल्या सांबरा रस्त्यावर देखील साइट तपासणी केली. तपासणीदरम्यान वारंवार अपघात होण्याची शक्यता दर्शविणारी पुढील निरीक्षणे आणि टिप्पण्या नोंदवण्यात आल्या आहेत. 1) असे आढळून आले की, क्षितिजसमांतर वळणाच्या टोकाच्या बाजूला कोणतेही क्रॅश बॅरियर, रिफ्लेक्टर किंवा गार्ड रेल बसवलेले नाहीत. या ठिकाणी फक्त लहान काँक्रीट खांब बसवले असून ते वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे खाली पडले होते. 2) जवळजवळ वळणाच्या क्षैतिज वक्राच्या मध्यभागी (अतिरिक्त बाजू) एक अप्रोच रोड आहे, जो दृश्यमान नाही. कारण तो विद्यमान वक्राच्या तुलनेत खालच्या बाजूला आहे. तेथे कोणतेही टी-जंक्शन सावधानता चिन्ह फलक नसल्यामुळे तो धोकादायक आहे.
सध्याच्या वळणाच्या परिस्थितीवर आधारित शिफारसी : 1) वक्राच्या संपूर्ण लांबीमध्ये वेग जास्तीत जास्त 60 कि.मी. प्रतितास मर्यादित असावा आणि एमओआरटी अँड एचच्या निर्देशांनुसार योग्य साइन बोर्ड बसवले पाहिजेत. 2) वळणाच्या सुरुवातीच्या ठिकाणी फ्लॅशिंग लाइट्स बसवण्याची सूचना. अप्रोच रोडच्या कडांवर दोन फ्लॅशिंग लाइट्स बसवावेत. 3) सध्याचे गार्ड रेल अद्ययावत प्रकारच्या गार्ड रेलच्या बदलले पाहिजे. 4) वळणावर अतिवेग कमी करण्यासाठी वळणाच्या दोन्ही बाजूंना रंबल स्ट्रिप्सची मालिका घालणे आवश्यक आहे. 5) अप्रोच रोडवर स्पीड ब्रेकर आणि “थांबा आणि पुढे जा” असा इशारा देणारा साइनबोर्ड बसवावा.




