
बेलगाम प्राईड/ येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (MARATHA LIRC) येथे दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी मिलिटरी-सीव्हिल फ्यूजन बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, कमांडंट व स्टेशन कमांडर यांनी भूषविले.
या बैठकीत एअरमन ट्रेनिंग स्कूल, NDRF, इंडियन रिझर्व्ह बटालियन (कर्नाटक), CRPF COBRA, तसेच काउंटर इन्सर्जन्सी जंगल वॉरफेअर स्कूल (ITBP) या संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत संयुक्त प्रशिक्षण, पायाभूत सुविधा सामायिकरण, तसेच आपत्ती व्यवस्थापन व अंतर्गत सुरक्षा यामध्ये समन्वय व सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये परस्पर सहकार्य वाढवून राष्ट्रीय सुरक्षेसोबतच आपत्ती व्यवस्थापनात सज्जता व तयारी अधिक परिणामकारक करण्याचे उद्दिष्ट यावेळी अधोरेखित करण्यात आले.
बैठकीस उपस्थित मान्यवरांमध्ये –
ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, कमांडंट,एम एल आय आर सी, कर्नल व्ही.के.बी. पाटील, प्रशिक्षण बटालियन कमांडर,एम एल आय आर सी, कर्नल छत्रपती बोरुडे, एम एल आय आर सी, मेजर अभिषेक कश्यप, प्रशिक्षण अधिकारी, डीआयजी (CIJW) ITBP ब्रिगेडियर संदीप झुंजा, डिप्टी कमांडंट, 44 ITBP राजकमल मलिक, स्क्वॉड्रन लीडर राशिद शेख, CIJW 2IC अशोक नेगी, असिस्टंट कमांडंट एन. पी. यादव, 24 KSRP बटालियन, कर्नल एच. एस. कोहली, HQ JL विंग, असिस्टंट कमांडंट जितेंद्र कुमार यादव, CRPF COBRA युनिट, इन्स्पेक्टर बब्लू विश्वास, NDRF
या बैठकीत संयुक्त तयारी व परस्पर सहकार्यामुळे देशांतर्गत सुरक्षा तसेच आपत्ती व्यवस्थापनात कार्यक्षमता व समन्वय अधिक मजबूत होईल, असा विश्वास सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.




