Uncategorized

दोन अवजड वाहनांचा अपघातामुळे जांबोटी- चोर्ला मार्गावर वाहतूक बंद….

बेलगाम प्राईड/ पणजी व्हाया चोर्ला मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक अवजड ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने दुसरी अवजड ओव्हरटेक करून जात असताना पलटी होऊन या मार्गावरील वाहतूक आज सोमवारी पहाटेपासून ठप्प झाली आहे.

जांबोटी पासून काही अंतरावर कालमणी ते आमटे दरम्यान सदर वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास जांबोटी होऊन गोव्याच्या दिशेने जाणारी एक अवजड ट्रक बंद पडली होती. त्या ट्रकला ओव्हरटेक करून दुसऱ्या बाजूने येणारी आणखीन एक अवजड ट्रक रस्त्याकडेला रुतून तेथेच पलटी झाल्याने रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.

त्यामुळे दोन्ही बाजूला जवळपास दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास सदर दोन्ही वाहनांना अपघात झाल्याने रात्रीपासून अनेक वाहनधारक या वाहतुकीत अडकल्याने प्रवासी वर्गाचा गोंधळ उडाला आहे. अनेक बसेस देखील या रस्त्यात अडकल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. त्यातच रात्रीपासून या भागात पावसाची रिपरिप सतत सुरूच आहे

त्यामुळे गोव्याहून बेळगावच्या दिशेने व बेळगावहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या अनेक प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. आज सोमवारी पहाटेपासून या राज्यमार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने आता त्या दोन्ही अपघात ग्रस्त अवजड वाहने जोपर्यंत हलवल्या जाणार नाही तोपर्यंत हा रस्ता खुला होणे शक्य नाही. शिवाय वाहने येण्या-जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे वाहनधारकांची गोची झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!