Uncategorized
Trending

भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरु वंदना – छात्र अभिनंदन’

विशेष कार्यक्रम अपूर्व उत्साहात 

बेलगाम प्राईड /भारत विकास परिषदेतर्फे ‘गुरु वंदना – छात्र अभिनंदन’ कार्यक्रम संत मीरा शाळेच्या माधव सभागृहात रविवारी सायंकाळी अपूर्व उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमांतर्गत विविध शाळांच्या 25 उत्कृष्ट शिक्षकांना मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह देऊन खास सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे 25 विद्यार्थी व 25 विद्यार्थिनी यांनाही यावेळी उत्कृष्ट छात्र पुरस्कार देऊन विशेष गौरविण्यात आले.

प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या स्वाती घोडेकर यांनी परिषदेच्या निःस्वार्थ सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक सेवाकार्याची माहिती दिली. प्राचार्य व्ही. एन्. जोशी यांनी “गुरुवंदना” कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षकांना सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह तसेच उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्तींनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजन जया नायक यांनी केले. शुभांगी मिराशी यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शहरातील प्रमुख शाळांचा यामध्ये सहभाग होता. यामध्ये सरस्वती गर्ल्स हायस्कूल, लव्ह डेल सेंट्रल स्कूल, ज्योती सेंट्रल स्कूल, के. एल्. एस्. स्कूल, ज्ञान प्रबोधन मंदिर, जी. जी. सी. इंग्लिश माध्यम स्कूल, बालिकादर्श विद्यालय, ठळकवाडी हायस्कूल, एम् . व्ही. हेरवाडकर स्कूल, बी. के. मॉडेल हायस्कूल, उषाताई गोगटे हायस्कूल, व्ही. एन्. शिवणगी स्कूल, अमृता विद्यालयम्, संत मीरा हायस्कूल अनगोळ, संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल हिंडलगा, महिला विद्यालय इंग्रजी माध्यम स्कूल, महिला विद्यालय मराठी माध्यम हायस्कूल, व्ही. एम्. शानभाग हायस्कूल, एम्. आर. भंडारी स्कूल, स्वाध्याय विद्यामंदिर, भरतेश इंग्रजी माध्यम स्कूल, जोशी सेंट्रल स्कूल, मुक्तांगण विद्यालय, क्रां. संगोळी रायण्णा हायस्कूल, प्रेशियस ब्लॉसम्स हायस्कूल या शाळांमधून निवडलेले शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी भारत विकास परिषदेचे डॉ. व्ही. बी. यलबुर्गी, डी. वाय. पाटील, विनायक घोडेकर, सुभाष मिराशी, सुहास गुर्जर, चंद्रशेखर इटी, अमर देसाई, रामचंद्र तिगडी, पी. एम्. पाटील, पी. जे. घाडी, ॲड. बना कौजलगी, प्रा. प्रतिभा हलप्पनवर, रजनी गुर्जर, विद्या इटी, प्रिया पाटील, तृप्ती देसाई, अक्षता मोरे, गीता बागेवाडी, निमंत्रित, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!