
बेलगाम प्राईड /नागपूर या इतिहास प्रसिद्ध शहरात 1925 मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या संघटनेची शताब्दी आज तिथीनुसार पूर्ण होत आहे. यानिमित्त वडगाव, बेळगाव येथील सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी ध्येय वेड्या, हिंदुत्ववादी, निर्धारित बाण्याच्या डॉ. केशव हेडगेवार यांना रांगोळीच्या माध्यमातून त्यांचे भावचित्र रेखाटून आदरांजली वाहिली आहे. सदर सबक लक्षवेधी अशी 3 फूट बाय 2 फूट आकाराची ही रांगोळी रेखाटण्यासाठी औरवाडकर यांना 11 तासांचा अवधी लागला. रांगोळीसाठी लेक कलर वापरला आहे. सदर रांगोळी ज्योती फोटो स्टुडिओ, नाझर कॅम्प, येळ्ळूर रोड, वडगाव बेळगाव येथे येत्या बुधवार दि. 8 ऑक्टोबर 2025 पर्यंत दररोज सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे.




