
बेलगाम प्राईड /राज्यातील पोलिस उपाधीक्षक व निरीक्षकांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये बेळगाव शहरासह जिल्ह्यातील काही निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. शहापूरचे निरीक्षक एस. एस. सीमानी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचा यादीत समावेश आहे.
राज्यातील २७ उपाधीक्षक व १३१ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचा आदेश सोमवारी (दि. ६) पोलिस प्रशासन विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक सौमेंदू मुखर्जी यांनी बजावला.
त्यात शहर व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शहापूरचे निरीक्षक सीमानी यांची लोकायुक्त विभागाकडे तर त्यांच्या जागी दावणगिरीचे संतोषकुमार डी. यांची नियुक्ती झाली आहे. सध्या मारीहाळचे निरीक्षकपद प्रभारी म्हणून मंजुनाथ नायक यांच्याकडे आहे. परंतु, येथे पूर्वी कार्यरत असलेले गुरुराज कल्याणशेट्टी यांची लोकायुक्त विभागात बदली झाली आहे. मारीहाळच्या निरीक्षकपदाची सूत्रे आता आय. आर. पट्टणशेट्टी स्वीकारणार आहेत.
नंदगडचे निरीक्षक एस. एस. पाटील यांची लोकायुक्त विभागात जागी रवीकुमार धर्मट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खानापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रभाकर धर्मट्टी यांची कारवारला तर सौंदत्तीचे निरीक्षक धर्माकर धर्मट्टी यांची केएसआरपी बेळगाव येथे बदली झाली आहे.
हुक्केरीचे निरीक्षक महांतेश बसापुरे आता संकेश्वरचा कार्यभार स्वीकारणार आहेत. संकेश्वरचे शिवशरण अवजी यांची लोकायुक्तकडे तर कारवार शहरचे रमेश हुगार यांची धारवाड शहर निरीक्षकपदी बदली झाली आहे.




