
बेलगाम प्राईड /कलिंगा स्टेडियम भुवनेश्वर ओडिसा येथे आयोजित 40 व्या राष्ट्रीय कनिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अनगोळ येथील कु. वैभवी बाळू बुद्रुक हिने रिले शर्यतीमध्ये कर्नाटक राज्याला रौप्य पदक मिळवून दिले.
ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 40 व्या राष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धेमध्ये बेळगाव येथील अनगोळच्या कु. वैभवी बाळू बुद्रुक हिने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करत 4 X 100 मीटर्स रिलेमध्ये 47:75 इतका वेळ देत द्वितीय क्रमांकासह कर्नाटक राज्याला रौप्य पदक मिळवून दिले. कर्नाटकच्या संघात वैभवी बुद्रुक, स्तुती शेट्टी, लेखना एस. आणि वर्षीथा या धावपटूंचा सहभाग होता.
वैभवी ही लिंगराज कॉलेजची विद्यार्थिनी असून तिला ॲथलेटिक्स प्रशिक्षक अशोक शिंत्रे व मधुकर देसाई यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अनगोळ येथील प्रतिष्ठित नागरिक बाळू बुद्रुक यांची कन्या असलेल्या वैभवीला आई-वडिलांसह लिंगराज कॉलेजचे प्राचार्य व क्रीडा शिक्षक श्री रामराव यांचे प्रोत्साहन लाभत आहे.




