
बेलगाम प्राईड/ कित्तूर महोत्सवाचा भाग म्हणून राज्यभरात मिरवणूक काढण्यात येत असते.दरम्यान खानापूर तालुक्यातील नंदगड मार्गे बेळगाव शहरात प्रवेश केलेल्या वीरज्योतीचे आज राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे महापौर मंगेश पवार यांनी स्वागत केले.
महानगरपालिका आयुक्त शुभा, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री, तहसीलदार बसवराज नागराल, मुरुगेश शिवपूजी, कस्तुरी भामवी आणि इतर उपस्थित होते.यावेळी कला पथकांसह शहराच्या मुख्य रस्त्यांवरून निघालेली वीरज्योत काकतीकडे रवाना झाली.

काकतीहून,हिरे बागेवाडी, चिक्क बागेवाडी,तिगडी, मरिकट्टी, संपगाव मार्गे बैलाहोंगलला रवाना होईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ९ ऑक्टोबर रोजी बेंगळुरूमधील विधान सौधाजवळ ज्योती यात्रेला हिरवा झेंडा दाखवला होता. ही ज्योती २३ ऑक्टोबर रोजी कित्तूरला पोहोचेल.




