
बेलगाम प्राईड/कौटुंबिक वादातून एका विवाहित इसमाने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे मारुती गल्ली येथे घडली.
विशाल परसराम शहापूरकर (वय ४५) रा. श्रीराम गल्ली कंग्राळी खुर्द असे जाळून घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. अति मद्द प्राशन करून पत्नीच्या घरी आला असता पत्नीने दरवाजा न काढल्याने मनस्ताप करून घेऊ घेऊन बुधवारी पहाटे पत्नीच्या घरासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन जाळून घेतले या घटनेत विशाल गंभीर जखमी झाला होता.
या घटनेची माहिती खडेबाजार पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलीस पहाटे दाखल होऊन गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या विशालला 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले
मात्र उपचाराचा काही उपयोग न होताच त्याच दिवशी दुपारी त्याचे निधन झाले. या घटनेचा गुन्हा खडेबाजार पोलीस स्थानकात नोंद झाला असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेहावर जिल्हा रुग्णालयात शवचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.




