
बेलगाम प्राईड/ सार्वजनिक शिक्षण खाते बागलकोट यांच्या वतीने बेळगाव विभागीय स्तरीय कबड्डी स्पर्धा जमखंडी तालुक्यातील चिमर्ड येथे झाल्या. या स्पर्धेत माध्यमिक गटात बालिका आदर्श विद्यालयाने उपांत्य सामन्यात सिरशी जिल्हाला 17-21 अशा फरकाने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामना बागलकोट सोबत झाला यामध्ये 10-19 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला व दुसरा क्रमांक मिळवला व बालिका आदर्श विद्यालयाच्या 3 खेळाडूंची दिया मोहिते,श्रद्धा पाटील,मनस्वी बिर्जे, या खेळाडूची राज्य स्तरीय स्पर्धे साठी निवड करण्यात आली आहे. हे खेळाडू बेळगांव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धा बेंगळूर या ठिकाणी 9 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2025 या दरम्यान पार पडणार आहे.
या संघात सरकारी सरदार या शाळेच्या विद्यालयाची खेळाडू लक्ष्मी राठोड व बालिका आदर्श विद्यालाचे 6 खेळाडू श्रावणी पाटील ,श्रद्धा पाटील ,मनस्वी बिर्जे ,दिया मोहिते, अंजली कटगालवकर ,स्नेहा बैलूर, या सर्व खेळाडूंचा या संघात समावेश आहे. या संघाला शाळेचे चेअरमन आनंद गाडगीळ , मुख्याध्यापक एन. ओ . डोणकरी व मंजुनाथ गोल्लीहळी यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक उमेश बेळगुंदकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे .




