Uncategorized
Trending

राज्योत्सवानिमित्त बेळगाव शहरात वाहतुक मार्गात बदल;

बेलगाम प्राईड / कर्नाटक राज्योत्सवाचे औचित्य साधून १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत बेळगाव शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. यावेळी सर्व अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असल्याने नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

🚧 वाहतूक मार्गातील बदल

1️⃣ चिक्कोडी, संकेश्वर, कोल्हापूरकडून येणारी वाहने:

केएलई रोड – कृष्णदेवराय (कोल्हापूर) चौक – कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल – जिनाबाकुळ सर्कल – बॉक्‍साईट रोड – हिंडलगा फॉरेस्ट नाका – गणेश मंदिर – गांधी सर्कल (अरगन तलाव) – शौर्य चौक (मिलिटरी हॉस्पिटल) – केंद्रीय विद्यालय क्र. 2 – शर्कत पार्क – ग्लोब थिएटर सर्कलमार्गे खानापूर रोडकडे पुढे जावे.

2️⃣ मध्यवर्ती बसस्थानक ते शनिवारी खूट मार्गावरील वाहने:

जिजामाता चौक – व्हीएएल लॉजिस्टिक – जुनी पीबी रोडमार्गे जावे.खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी अशोक स्तंभ – कनकदास सर्कल – निसर्ग ढाबा – केपीटीसीएल रोड – केएलई डेंटल कॉलेज – केएलई हॉस्पिटल – बॉक्‍साईट रोडमार्गे हिंडलगा व गांधी सर्कलमार्गे पुढे जावे.

3️⃣ जिजामाता चौक / देशपांडे पेट्रोल पंपाकडून नरगुंदकर भावे चौक / कांबळी खूटकडे जाणारी वाहने: रविवारी पेठ – पिंपळकट्टा – पाटील गल्ली – स्टेशन रोड – गोगटे सर्कलमार्गे खानापूर रोडकडे जावे.

4️⃣ खानापूरकडून कॉंग्रेस रोडमार्गे शहरात येणारी वाहने:

मिलिटरी महादेव मंदिराजवळ डावीकडे वळून – आसादखान दर्गा – गवळी गल्ली – गोगटे सर्कल – ग्लोब थिएटर – शर्कत पार्क – केंद्रीय विद्यालय क्र. 2 – शौर्य चौक – गांधी सर्कल – गणेश मंदिर – हिंडलगा रोड – हनुमान नगर डबल रोड – बॉक्‍साईट रोड – जिनाबकुळ चौक – राष्ट्रीय महामार्गमार्गे पुढे जावे.

KSRTC बसेस हिंडलगा सर्कल अंडरब्रिजमार्गे – NH-48 – कॅन्सर हॉस्पिटल पुढे वळण घेऊन – कनकदास सर्कलमार्गे बसस्थानकात प्रवेश करतील.

🅿️ मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग स्थळे सरदार मैदान सीपीएड मैदान (क्लब रोड, बेलगाव) महिला पोलीस ठाण्याच्या मागील पोलीस विभागाचे मैदान जिल्हा न्यायालय व नवीन न्यायालय परिसर

पोलिसांचे आवाहन/ राज्योत्सव मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त राखावी, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!