
बेलगाम प्राईड /मोजमाप विभागाच्या कायद्याशी संबंधित दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नां संदर्भात आता वजन आणि मोजमाप विभागाकडून कापड व्यापाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण याबाबत कापड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर तसेच पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन
सोमवारी बेळगाव कापड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर व पदाधिकाऱ्यांनी वजन आणि मोजमाप विभागाचे आयुक्त चंद्रशेखर बसवप्रभुजी (उपविभाग १ आणि २) यांची भेट घेऊन कायद्या संदर्भात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्ना संदर्भात निवेदन सादर केले.
यावेळी झालेल्या बैठकीत अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रातील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचा विचार करून संबंधित नियम आणि कायद्यांविषयी व्यापाऱ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी विभागाने जनजागृती उपक्रम राबवावा, अशी विनंती केली.
त्यावर चंद्रशेखर बसवप्रभुजी यांनी स्वतः या प्रश्नांकडे वैयक्तिकरित्या लक्ष देण्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरच कापड व्यापारी संघटनेच्या सहकार्याने एक शैक्षणिक प्रशिक्षण आयोजित करून व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बेळगाव कापड व्यापारी संघटनेते अध्यक्ष सतीश तेंडुलकर, मुकेश खोडा,अरविंद जैन, हेमेंद्र पोरवाल इतर उपस्थित होते.




