
बेलगाम प्राईड /बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स 54 व्या राष्ट्रीय केंद्रीय विद्यालयचे स्केटिंग पट्टू सी बी एस ई दक्षिण विभागीय स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धे मध्ये सुमारे 700 हून जास्त विविध राज्यातील स्केटिंग स्पर्धकानी सहभाग घेतला होता. या स्पर्धा पाँडिचेरी व केरळ येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत बेळगांवच्या स्केटर्सनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 1 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्य अशी एकूण 5 पदके जिंकली आहेत.
II पदक विजेते स्केटर्स खालील प्रमाणे ll
सौरभ साळोखे 1 सुवर्ण,1 रौप्य, अनघा जोशी 1रौप्य, सत्यम पाटील 1 कांस्य, प्रांजल पाटील 1कांस्य
वरील सर्व स्केटर्स के एल ई सोसायटी स्केटिंग रिंक व गुड शेफर्ड स्केटिंग, शिवगंगा स्केटिंग रिंक येथे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून या सर्वांना डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी इंदुधर सीताराम याचे प्रोत्साहन मिळत आहे.




