
बेलगाम प्राईड/ खेळ हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ताणतणावाच्या जीवनात आरोग्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ५ ते १० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत बेळगावच्या गणेशपूर रोडवरील बेळगाव सिटी फुटबॉल मैदानात अखिल भारतीय AAI आंतर-क्षेत्रीय फुटबॉल स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन केले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि बेळगाव विमानतळाचे AAI विमानतळ संचालक एस. त्यागराजन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले

या वेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी “श्रीमंत आणि मनमिळावू सुंदर बेळगावमध्ये क्रीडापटूंचे स्वागत आहे” असे ते म्हणाले त्यांनी सांब्रा केंद्रीय विद्यालय एक या विद्यार्थ्यांच्या परेडचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, खेळ हे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि ताणतणावाच्या जीवनात आरोग्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. “सुदृढ आरोग्य हे सुखी जीवनाचे मूळ आहे,” असे त्यांनी आपल्या शायरीतून नव्या पद्धतीने जनजागृती निर्माण केली.
बेळगाव विमानतळाचे AAI विमानतळ संचालक एस. त्यागराजन यांनी सांगितले की, भारताच्या विविध भागांतील सहा AAI कर्मचाऱ्यांच्या संघांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे — दक्षिण विभाग, उत्तर विभाग, पूर्व विभाग, पश्चिम विभाग, ईशान्य विभाग आणि कॉर्पोरेट मुख्यालय व आणि इतर मान्यवर उपस्थित होते.




