
बेलगाम प्राईड/ कर्नाटक राज्य ऑलम्पिक संघटनेतर्फे बेंगलोर येथे गेल्या 2 ते 4 नोव्हेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय 15 वर्षाखालील मिनी ऑलम्पिक कुस्ती स्पर्धेत बेळगाव युथ हॉस्टेलच्या कुस्तीपटुंनी 6 सुवर्ण पदकांसह एकूण 14 पदके हस्तगत करून घवघवीत यश संपादन केले आहे.
बेळगाव युथ हॉस्टेलच्या कुस्तीपटुंनी मिळविलेले यश पुढीलप्रमाणे आहे. मुलींच्या गटात सुवर्ण पदक : प्रांजल बिर्जे (33 किलो गट), संध्या शिरहट्टी (42 किलो गट), चैतन्या (46 किलो गट), सानिका हिरोजी (54 किलो गट), नंदिनी (57 किलो गट). रौप्य पदक : आराध्या हलगेकर (46 किलो गट), श्रीनिवास तरळे (66 किलो गट), कांस्य पदक : नुतन पाटील (36 किलो गट), श्रुती मादार (39 किलो गट), अदिती कोरे (50 किलो गट).
मुलांच्या गटात सुवर्णपदक : श्रीशैल कर्णी (68 किलो गट फ्रीस्टाईल), रौप्य पदक : कैलाश ए. टी. (68 किलो गट, ग्रीको-रोमन), कांस्य पदक : संदीप शिरहट्टी (52 किलो गट), प्रथमेश अवळे (44 किलो गट). या सर्व कुस्तीपटूंना बेळगाव क्रीडा खात्याचे उपसंचालक बी. श्रीनिवास, स्पोर्ट्स हॉस्टेलच्या कुस्ती प्रशिक्षिका स्मिता पाटील, प्रशिक्षक मंजू मादार, हनुमंत पाटील आणि नागराज यांचे मार्गदर्शन लाभले आहे.




