
बेलगाम प्राईड : कोडगू जिल्हा फुटबॉल संघटना व सार्वजनिक शिक्षण खाते कोडगू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनच्या दिवशी बेळगांव जिल्हा फुटबॉल संघ विजयी चालिकडेघौडदोड सुरू केली
कोडगू अम्मती फुटबॉल स्टेडियमवर आयोजित या स्पर्धेतील 17 वर्षाखालील मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात बेळगाव संघाने प्रतिस्पर्धी म्हैसूर संघाचा 1-0 अशा गोल फरकाने पराभव केला. विजयी संघाच्या अब्दुल मुल्ला यांने एकमेव विजयी गोल केला. दुसऱ्या सामन्यात बेळगाव संघाने प्रतिस्पर्धी गुलबर्गा संघावर 2-0 असा विजय मिळविला. विजयी संघाच्या ईशान देवगेकर व बालाजी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. 14 वर्षाखालील मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात बेळगाव संघाने प्रतिस्पर्धी म्हैसूर संघाला 1-0 असे पराजित केले. विजयी संघाच्या नवीन पत्की याने एकमेव गोल केला.
17 वर्षाखालील मुलींच्या गटातील सामन्यात बेळगाव व म्हैसूर या संघांमधील लढत गोल 0-0 बरोबरीत राहिली. 14 वर्षाखालील मुलींच्या गटातील सामन्यात बेळगांव संघाने प्रतिस्पर्धी कलबुर्गी संघाचा 2-0 असा पराभव केला. विजयी संघाची कर्णधार निधीशा दळवी व धृती शेट्टी यांनी प्रत्येकी एक गोल केला. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघाला प्रशिक्षक मानस नायक, सबेस्टियन फर्नांडिस, विनायक पुजारी, मानव डिक्रुझ, कमलाक्षी राजूकर, आदित्य सानी, स्वरूप हलगेकर, पुनित शेट्टी, विशाल देवगेकर, यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आता उद्या रविवार दि. 9 रोजी होणारे सामने पुढील प्रमाणे आहेत. 17 वर्षाखालील मुली : बेळगाव वि कलबुर्गी (सकाळी 7.15 वाजता). 14 वर्षाखालील मुली : बेळगाव वि. म्हैसूर (सकाळी 8.00 वाजता), 17 वर्षाखालील मुले : बेळगाव वि. बंगळुर (सकाळी 10.30 वाजता).17 वर्षाखालील मुली : बेळगाव वि. बंगळुर (दुपारी 2.15 वाजता). 14 वर्षाखालील मुली : बेळगांव वि. बंगळुर (दुपारी 3.45 वाजता).




