
बेलगाम प्राईड/ बेळगाव दौरावर असलेले केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटवलेली अंजली शिंदे हिचा सन्मान केला.
रविवारी माजी खासदार प्रभाकर कोरे यांच्या कॅम्प येथील निवासस्थानी आर्लेकर मुक्कामी आले होते. यावेळी यांनी अंजली शिंदे हिचा सत्कार केला. यावेळी उद्योजक प्रसन्न घोटगे, नगरसेवक रवी साळुंखे आदी उपस्थित होते. उद्योजक प्रसन्न घोटगे यांनी कुस्तीपटू अंजली शिंदे ला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
मिनी ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलची विद्यार्थिनी अंजली शिंदेने 43 किलो वजन गटात रौप्य पदक मिळवले होते. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.




