
बेलगाम प्राईड अथणी / जागा देण्याच्या व्यवहाराबाबत दोन व्यक्तींमधील आर्थिक व्यवहार निकाली काढण्यासाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून अथणी येथील सीपीआय संतोष हळ्ळूर यांच्या विरोधात लोकायुक्त पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकायुक्त कार्यालयात अथणीतील रहिवासी मीरसाब मुझावर यांनी सीपीआय संतोष हळ्ळूर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.अथणीतील रहिवासी अनुपकुमार नायर यांना मीरसाब मुझावर यांनी दोन जमिन खरेदी व्यवहारासंदर्भात २० लाख रुपये दिले होते.
दोन जागा देण्याचे सांगून अनुपकुमार यांनी पैसे घेतले मात्र ठरलेल्या व्यवहारानुसार जमीन न दिल्यामुळे पैसे परत मिळवण्यासाठी मीरसाब मुझावर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविण्यासाठी विचारपूस केली होती.
पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर यांनी मीरसाब यांच्याकडे फोनवरून चर्चा करून लाच मागितल्याचे संभाषणाचा रेकॉर्डिंग करण्यात आलेला ऑडिओच्या आधारे तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर लोकायुक्त पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने आज अथणी पोलिस ठाण्यावर छापा टाकून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अथणी सीपीआय संतोष हळ्ळूर यांनी सांगितले की— “मी कोणत्याही व्यवहारासाठी पैशाची मागणी केलेली नाही. त्यांनीच वारंवार फोन करून पैशांबाबत चर्चा केली,” असल्याचे असे स्पष्ट केले आहे.




