Uncategorized
Trending
महंतेश उद्यानातील पाणीपुरवठा खंडित; झाडे सुकण्याच्या स्थितीत
महापौरांकडे तातडीच्या पाणीपुरवठ्याची मागणी

बेलगाम प्राईड/ मृत्युंजय नगर येथील महंतेश उद्यानामधील पाणीपुरवठा अचानक बंद झाल्याने उद्यानातील झाडे सुकण्याची वेळ आली आहे. उद्यानातील हरित क्षेत्र वाचवण्यासाठी महानगरपालिके कडून २४x७ पाणीपुरवठा योजनेतील पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करत महापौर मंगेश पवार यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी अरुण गावडे व जितेंद्र देवण उपस्थित होते. महापौरांनी निवेदनाची दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती देण्यात आली.




