
बेलगाम प्राईड /जर्मनी येथे होणाऱ्या मिस्टर युनिव्हर्स 2025 स्पर्धेसाठी बेळगावचा सुपुत्र विनोद पुंडलिक मेत्री यांची निवड झाली असल्याने बेळगावचे नाव एक सुवर्ण अक्षरात नोंद झाले आहे.
अनगोळ येथे जन्मलेल्या विनोद मेत्री यांना त्यांच्या दिवंगत वडिलांकडून — कैलासवासी पुंडलिक मेत्री यांचे प्रचंड सहकार्य आणि प्रेरणा मिळाली आहे. शालेय शिक्षण संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल तर महाविद्यालयीन शिक्षण आरपीडी कॉलेज येथे पूर्ण केले आहे.शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी करत विनोदने RPD श्री हा किताब पटकावला तसेच युनिव्हर्सिटी ब्लू मध्ये सुवर्णपदकही मिळवले.
राजेश लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली विनोदने शरीरसौष्ठव क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आणि त्याच कामगिरीच्या जोरावर स्पोर्ट्स विभागातून अंतर्गत भारतीय लष्करात दाखल झाला. सध्या ते मराठा लाईट इन्फंट्री, बेळगाव येथे हवालदार म्हणून कार्यरत आहेत.
विनोद मेत्री यांना बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन आणि स्पोर्ट्स तसेच SSS फाउंडेशनचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. मिस्टर युनिव्हर्स – 2025 साठी विनोद मेत्री यांना शुभेच्छा देण्यात आले आहेत. बेळगाव आणि भारताचा तिरंगा यावेळीही अभिमानाने उंचावणार यात शंका नाही!




