
बेलगाम प्राईड/ तेजस्विनी ओमकार तमूचे यांना कर्नाटक स्टेट लॉ युनिव्हर्सिटी हुबळी (KSLU) मध्ये क्रिमिनल लॉ (LLB) या विषयात सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण होऊन सुवर्णपदकाची मानकरी ठरली युनिव्हर्सिटी तर्फे सन्मानित करण्यात आला.
तेजस्विनी या बेळगावचे पंच दि पायोनियर अर्बन बँक बेळगांव चे शाखा व्यवस्थापक विजय नारायण तमूचे यांच्या त्या स्नुषा आहेत.
7 व्या वर्षीय पदवी पूर्व कार्यक्रमात थावरचंद गेहलोत, (कर्नाटकचे राज्यपाल) डॉ. एच. के. पाटील (कायदा न्याय मंत्री मानवाधिकार कर्नाटक) डॉ. न्यायमूर्ती शिवराज व्ही. पाटील (सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश) न्यायमूर्ती अब्दुल नजीर (आंध्र प्रदेशचे राज्यपाल,) व्ही सुदेश पाई जी (बंगलोरचे ज्येष्ठ वकील) डॉ. सी. बसवराज (कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठाचे कुलगुरू) यांच्या उपस्थितीत सुवर्णपदकाचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.




