
बेलगाम प्राईड / अनोळखी व्यक्तीने पेटता सिगारेट टाकून गेल्याने भंगारत पडलेल्या दुचाकी वाहने आगीत भस्मसात झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी शेट्टी गल्ली येथे घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की शेट्टी गल्ली येथे स्क्रॅपचा अड्डा असून तेथे चार दुचाकी वाहने दुरुस्तीसाठी आणून ठेवण्यात आल्या होत्या. या ठिकाणी सिगारेट पीत असलेल्या एका व्यक्तीने भेटता सिगारेट या ठिकाणी टाकल्याने स्क्रॅपच्या अड्ड्यातील फ्रिजच्या वायरने अचानक पेठ घेतल्याने ही घटना घडली.

ही आग झपाट्याने आसपास पसरली. या आगीमुळे पार्क करण्यात आलेल्या दुचाकींनीही पेट घेतला. सदर प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी, कामगारांनी प्रसंगावधान राखून पाणी मारल्याने ही आग आटोक्यात आणून विझवली. मात्र तोपर्यंत चारही नादुरुस्त दुचाकीवाहने आगीत भस्मसात झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रहिवाशांनी वेळेवर आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. संपूर्ण आग विझवल्यानंतर अग्निशामक दलाचा बंब तिथे हजर झाला होता.ही आगीची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.




