
बेलगाम प्राईड/ 39 वी ऑल इंडिया इंटर रेल्वे बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप ही स्पर्धा झारखंड येथील चक्रधारपुर येथे आयोजित करण्यात आली होती, ही स्पर्धा SERSA ने केली होती. ह्या स्पर्धा 8 डिसेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत सलग 3 दिवस चालू होत्या स्पर्धेमध्ये बेळगांवचा रेल्वे मधील शरीर सौष्ठव पटू केदार पाटील हा 65 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक पटकाविले आहे.
स्पर्धेत मध्ये (1)साऊथ इस्ट रेल्वे 100 गुण ने टीम चॅम्पियन शिप पटकाविले,(2) सेंट्रल रेल्वे 52 गुण,(3)साऊथ वेस्टर्न रेल्वे 45 गुण (4)साऊथ रेल्वे 27 गुण (5) ICF 15 गुण. केदार पाटील यांला संघ प्रशिक्षक व मी.इंडिया,व एकलव्य पुरस्कर्ते प्रीतम चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले केदार पाटील यांचे बेळगांव जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्स व कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्सच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व भावी वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.



