
बेलगाम प्राईड : पोलिओमुक्त समाज हेच आमचे ध्येय आहे. आपल्या आसपासच्या पोलिओ लसीकरण केंद्राला भेट देऊन ५ वर्षांखालील सर्व मुलांना आवर्जून दोन थेंबांची लस देऊन पोलिओविरोधी लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केले.
गोकाक शहरातील महिला व बाल रुग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय पल्स पोलिओ कार्यक्रमात त्यांनी एका बालकाला पोलिओ लस देऊन उपस्थितांना संबोधित केले.
देशभर पोलिओ लसीकरण व त्याबाबत जनजागृती अभियान सुरू असून, सातत्यपूर्ण जागृतीमुळे पोलिओ आजारावर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. १९७८ पासून हे अभियान सुरू करण्यात आले असून, गेल्या १४ वर्षांपासून देश पोलिओमुक्त आहे. तरीही पालकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. मुलांना आवर्जून दोन थेंबांची लस देऊन पोलिओविरोधी लढ्यात सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.




