
बेलगाम प्राईड पुणे/ काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे आज (6 जानेवारी) पुण्यातील निवासस्थानी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
सुरेश कलमाडी यांचे पार्थिव दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी याच्या निवासस्थानी अंत्यदर्शनसाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर कलमाडी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. पुण्याच्या राजकारणात कलमाडी यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यामुळे सुरेश कलमाडी अनेक वर्षे पुण्याचे खासदार राहिले. एक मोठा काळ कलमाडी यांची पुण्याच्या राजकारणावर वर्चस्व राहिले होते.




