
बेलगाम प्राईड / सांबरा गावामध्ये सुमारे २ कोटी रुपयांच्या खर्चातून प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांसाठी आज भूमिपूजन करून ग्रामस्थांच्या उपस्थितीत कामांना सुरुवात करण्यात आलले
ग्रामीण भागाच्या आमदार बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून गावातील नागरी समस्यांच्या कामाचा शुभारंभ यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश उपस्थित होते.
काँक्रीट व डांबरी रस्ते, फेव्हर्स बसविणे तसेच गटार बांधकामाच्या कामांना चालना देण्यात आली असून, सार्वजनिक मालमत्तेला कोणतीही अडचण होऊ नये यासाठी ठरलेल्या कालावधीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच गावातील महिला उपस्थित होत्या.




