बेळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड

बेलगाम प्राईड/ बेळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया जर्नालिस्ट असोसिएशनला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील कार्यकाळासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यानिमित्त मंगळवारी बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे संघटनेच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत पुढील कार्यकाळासाठी संघटनेच्या नव्या अध्यक्षपदी न्यूज 18 कन्नडचे ज्येष्ठ प्रतिनिधी चंद्रकांत सुगंधी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेच्या महासचिवपदी टीव्ही-5 चे ज्येष्ठ प्रतिनिधी श्रीधर कोटारगस्ती, खजिनदारपदी टीव्ही-9 चे ज्येष्ठ प्रतिनिधी सहदेव माने, तर सहसचिवपदी सुवर्णन्यूजचे ज्येष्ठ कॅमेरामन अदिवेश पाटील यांची निवड करण्यात आली. उर्वरित पदाधिकारी पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले.
यावेळी माजी अध्यक्ष मंजुनाथ पाटील, सन्माननीय अध्यक्ष श्रीकांत कुबकड्डी, उपाध्यक्ष चंद्रू श्रीरामुडू, कार्यकारिणी सदस्य संतोष श्रीरामुडू, अजित सण्णक्की, मंजुनाथ रेड्डी, अनिल काजगार, सिद्धेश पुठाणी, मैलारी पटात, सिद्धनगौडा पाटील, मंजुनाथ हुडे़द, राजेश हुगार, सुनील गावडे, रोहित शिंदे, प्रविण शिंदे, रवी भोवी, विश्वनाथ पाटील, प्रताप चवडिकर, अशोक कबाडगी, महांतेश हडपद, शिवू हुल्लोळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.




