
बेलगाम प्राईड/बैलहोंगल तालुक्यातील मुरकुंबी येथील साखर कारखान्यात बॉयलर स्पोट होऊन गरम मळीने भाजलेल्या कामगारांच्या जखमीतील आणखीन एकाचा पहाटे मृत्यू झाला. भरतेश बसप्पा सारवाडी (वय 26) रा. गोडचनमल्कि असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
काल बुधवारी दुपारी बैलहोंगल येथील साखर कारखान्यात बॉयलरचा स्पोर्ट होऊन गरम मळीने आठ कामगार भाजून गंभीर जखमी झाले यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता तर पाच जणांना गंभीर जखमी अवस्थेत असलेल्यांना झिरो ट्रॅफिक करून केलेली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
यामध्ये उपचार सुरू असताना गंभीर अवस्थेत असलेला भरतेश बसपा सरवाडी याचा पहाटे २- १२ वाजता मृत्यू झाला. याचा पोलीस पंचनामा करून मृतदेहावर केएलई रुग्णालयात शिवचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याच्यावर गोडचनमल्लकी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.



