
बेलगाम प्राईड / बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील इनामदार साखर कारखान्यात झालेल्या बॉयलरच्या गळतीच्या स्फोटातील मृतांची संख्या आता आठवर पोहोचली आहे. उकळता द्रव पदार्थ अंगावर पडल्याने गंभीर भाजलेल्या आठ कामगारांपैकी तिघांचा बुधवारी मृत्यू झाला होता तर शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान आणखी शेवटच्या आठव्या रुग्णाचा मृत्यू झाला.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी कारखान्याच्या जनरल मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा सविस्तर तपशील सादर केला.
७ जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास कारखान्याच्या बॉयलिंग हाऊसमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असताना ही हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत दीपक मुनवळ्ळी (३२, नेसरगी), अक्षय चोपडे (४८, रबाकवी), सुदर्शन बनोशी (२५, खानापूर), मंजुनाथ गोपाळ तेरदाळ (३१, अथणी), गुरुपादप्पा गिराप्पा तमण्णावर (३८, जमखंडी), भरतेश सारवाडी (२७, गोकाक) आणि मंजुनाथ मडिवाळप्पा काजगार (२८, बैलहोंगल) या सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. राघवेंद्र गिरीयाल (वय 33)या कामगाराचा आज शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.
स्थानिक पत्रिकेमध्ये काल मृत्यू झाला असे प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे आज शुक्रवारी सकाळी रघवेंद्रच्या नातेवाईकांनी केली रुग्णालयात आमचा मुलगा मृत्यू झालेला असताना आम्हाला का माहिती दिल्याने असा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नातेवाईकांना तुमचा रुग्ण पहा असे सांगून दाखविण्यात आले यानंतर एक तासाने त्याचा मृत्य झाला असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना दाखवून नंतर डॉक्टरांनी घोषित करण्यात आले या मृतदेहावर पंचनामा करून शवचिकित्सा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.




