
बेलगाम प्राईड / बॉक्साईट रोड सार्वजनिक ठिकाणी पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी धाड घालून चौघा जणांना अटक करून त्यांच्या जवळून रोख 3,840 रुपये जप्त केले आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे समीर राजाकांत पठाण (वय 32) रा. शाहूनगर, बबन जयवंत जोशी (वय 36) रा. कंग्राळी खुर्द, सलीम निसार लष्करवाले (वय 45) रा. गांधीनगर, इलियास रजाखान पठाण (वय 40) रा. काळी आमराई असे अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत.
हे सर्वजण काल गुरुवारी बॉक्साईट रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ सार्वजनिक ठिकाणी पत्त्यांचा जुगार खेळत होते. त्यावेळी एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय होनवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून सर्वांना ताब्यात घेतले.
तसेच त्यांच्या जवळील रोख 3,840 रुपये जुगारासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
मटका बुकिला अटक

शहरातील खडेबाजार रोडवर सार्वजनिक ठिकाणी मटका घेणाऱ्या एका बुकीला मार्केट पोलिसांनी काल गुरुवारी अटक करून त्याच्या जवळील रोख 1090 रुपये आणि मटक्याचा चिठ्ठ्या जप्त केल्या. दीपक मारुती सावंत (वय 55) रा. खडेबाजार असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी काल सायंकाळी सदर कारवाई केली. याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.




