Uncategorized
Trending

येळ्ळूर प्रकरणातील आरोपींचा न्यायालयात जबाब नोंदवला

बेलगाम प्राईड / महाराष्ट्र राज्य येळ्ळूर येथील फलक आणि त्यावरून उद्भवलेल्या संघर्षा संदर्भातील खटल्याची सुनावणी आज बेळगाव येथील दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयात पार पडली. या सुनावणी दरम्यान संबंधित प्रकरणातील आरोपींचे जबाब नोंदवून घेण्यात आले असून न्यायालयाने या खटल्याची पुढील तारीख ४ फेब्रुवारी २०२६ निश्चित केली आहे.

या खटल्यातील एकूण १० आरोपींपैकी कुमार परशुराम मासेकर, केदारी रागोजी पाटील, नंदू गोपाळ कुगजी, राहुल अर्जुन अष्टेकर, नामदेव विठ्ठल कदम, राजू ज्योतिबा नायकोजी, सुधीर परशुराम धामणेकर, जयसिंग यल्लाप्पा अष्टेकर आणि प्रकाश नारायण कुगाजी हे ९ जण न्यायालयात हजर होते.

या प्रकरणातील आरोपी क्रमांक २ मनोज लक्ष्मण नायकोजी यांचे यापूर्वीच निधन झाले असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली.

या खटल्यासंदर्भात अँड. शामसुंदर पत्तार आणि अँड. हेमराज बेंचन्नावर यांनी आरोपींच्या वतीने न्यायालयात प्रबळ युक्तिवाद मांडला. येळ्ळूरशी संबंधित एकूण ७ विविध खटले दाखल होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!