
बेलगाम प्राईड /रुग्णांच्या घरोघरी जाऊन आरोग्याची सेवा बजावणाऱ्या युवकाचा काँग्रेस रोड ठळकवाडी येथे अपघात कडून जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.
मुत्तया शंकरया यरगुद्दींमठ (वय 30) रा. नैसर्गिक असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.हा युवक यापूर्वी बेंगलोर येथे परिचारिका म्हणून सेवा बजावीत होता यानंतर त्याने बेळगाव मध्ये सेवा सुरू केली. मुतया हा युवक दुचाकीवरून रुग्णाची सेवा बजावण्यासाठी काँग्रेस रोड वरून जात होता. त्यावेळी त्यांनी दुभाजकाच्या विरुद्ध दिशेने आपले वाहन नेले वेळी समोरून येणाऱ्या ट्रकला ठोकल्याने त्या दुचाकी वरील युवकाचा चेंदामेंदा होवुन जागीच मृत्यू झाला.
या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने त्या भागातून ये जा करणाऱ्या नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. या अपघाताच्या ठिकाणी समाजसेवक अवधूत तुडेकर व त्याचे सहकार्याने येऊन पोलिसांच्या सहाय्याने विद्रूप अवस्थेत पडलेला मृतदेह उचलून रुग्णवाहिकेतून शवचीकिस्थितेसाठी जिल्हा रुग्णालयात धाडण्यात आले. या घटनेचा गुन्हा वाहतूक दक्षिण स्थानकात नोंद झाला आहे.




