Uncategorized
Trending
शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी; सिटीझन्स कौन्सिलचे पोलीस आयुक्तांना निवेदन

बेलगाम प्राईड/ शहरातील वाढती वाहतूक कोंडी वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असताना व्यस्त वेळेत बेळगाव शहर हद्दीत अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालावी, अशी ठाम मागणी सिटीझन्स कौन्सिल, बेळगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात कौन्सिलने पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सध्या तिसरे व चौथे रेल्वे गेट बांधकामामुळे बंद असल्याने संपूर्ण वाहतूक काँग्रेस रोडवरील पहिल्या व दुसऱ्या रेल्वे गेटवर अवलंबून आहे. टिळकवाडीच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा हा मार्ग शहरातील प्रमुख दळणवळणाचे केंद्र बनले आहे. तसेच या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे. यासाठी पोलीस विभागाने यावर ठोस निर्णय घेऊ शहरात येणाऱ्या अवजड वाहनांवरती कारवाई करावी




