
बेलगाम प्राईड/ खाऊ कट्टा येथे दुकान वाटप प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका क्र. 19069/2025 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सत्याला विजय मिळाला असून, नगरसेवक मंगेश पवार व जयंत जाधव यांच्या बाजूने न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिला आहे. दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी झालेल्या सुनावणीत माननीय उच्च न्यायालयाने त्यांच्यावर लादलेली अपात्रतेची कारवाई रद्द करत, सर्व आरोपांना कायदेशीर पातळीवर पूर्णविराम दिला.
या प्रकरणात शहरी विकास विभागाचे प्रधान सचिव व अपीलीय प्राधिकरण, बंगळूरू यांनी प्रादेशिक आयुक्त, बेळगाव विभाग यांच्या आदेशास मान्यता देत, कर्नाटक महानगरपालिका अधिनियम 1976 च्या कलम 26(1)(K) अंतर्गत पवार व जाधव यांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरवले होते. याच आदेशाला आव्हान देत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
आरोप काय होते?
तक्रारदाराकडून असा आरोप करण्यात आला होता की, पवार व जाधव यांनी नगरसेवक पदाचा गैरवापर करून टिनसू कट्टे येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उभारलेल्या दुकानांच्या लिलावात अनुचित लाभ मिळवला. न्याय




