
बेलगाम प्राईड /राज्य काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्व बदलाचा मुद्दा तापलेला असतानाच दलित मुख्यमंत्री पदाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यात दलित बनता मुख्यमंत्री न बनल्याची मला खंत आहे. हाय कमांडणे मनात आणले तर सर्व काही होईल अशी नाराजी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे मंत्री के एच मुनियाप्पा यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री पदासाठी वक्कलिंग समुदायातील प्रभावी नेते उपमुख्यमंत्री डी के.शिवकुमार यांच्याकडून प्रयत्न सुरू असताना मंत्री मुनियाप्पा यांनी देखील दलित मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा उपस्थित केला आहे. यापूर्वी गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर यांनी यावर भाष्य केले होते. बेंगलोर येथे गुरुवारी पत्रकारांची बोलताना मुनियाप्पा यांनी दलित नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याची अप्रत्यक्षपणे मागणी केली.
हाय कमांडणे मनात आणले तर सर्व काही होईल हा एक मांडला कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यावा हे ठाऊक आहे आता निर्णय घेण्याच्या ठिकाणी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आहेत त्यामुळे आम्ही आणखीन काय बोलणार असे ते म्हणाले.




