
बेलगाम प्राईड/अनगोळ विभागातील एका युगाच्या मोबाईल क्रमांकावरील कॉल अन्य क्रमांकवर वळविण्यात आला तसेच त्याच्या बँक खात्यातील 18 लाख रुपये हडप करण्यात आले या घटनेची खळबळ उडाली असून यासंबंधी शहर सायबर क्राईम विभागात गुन्हा दाखल झाला आहे.
अलीकडच्या काळातील सायबर गुन्ह्यागारानी हा एक नवा प्रकार घडवून आणला आहे आजवर एपीके फाईल पाठवून किंवा अन्य मार्गाने सावर्जाच्या बँक खात्यातील रक्कम हडप करण्यात येत होती प्रथमच एका युवकाचा मोबाईल क्रमांक आपल्या नंबर वर ड्रायव्हर करून त्याच्या बँक खात्यातील रक्कम सायबर गुन्हेगारांनी हडप केली आहे.
बाबली गल्ली अनगोळ येथील निलेश याने बुधवारी सायबर क्राईम विभागात अज्ञाताविरद्ध फिर्याद दिली आहे. या व्यवसायिक युवकाकडे जिओ वोडाफोन अशी दोन सिम कार्ड आहेत या सिम कार्ड वरील कॉल सायबर गुन्हेगारांनी 10 जानेवारी रोजी सकाळी 10- 21वा. मिनिटांनी एका मोबाईल क्रमांकावर कॉल ड्रायव्हर केले या युवकाला तब्बल 18 ला कान गंडविले आहे. ज्या मोबाईल वरून त्याचे दोन्ही सिम कार्ड ड्रायव्हर केले होते त्या क्रमांकावरून पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध घेणे सुरू केले आहे आजवर सावजाला थकवण्यासाठी किमान ओटीपी चे तरी गरज भासत होती आता कॉल ड्रायव्हर करून टाकवण्याचा नवाच फंडा सुरू केला आहे त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.




