Uncategorized
Trending

चव्हाट गल्लीत बालाजी मंदिराचा चौकट उभारणीचा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न

बेलगाम प्राईड/ चव्हाट गल्लीतील पौराणिक बालाजी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात येत आहे. लाखो रुपये खर्चून या मंदिराची उभारणी करण्यात येत असून बुधवारी सकाळी 11 वाजता मंदिराचा चौकट उभारणीचा कार्यक्रम विधिवत पुजनासह नुकताच पार पडला.पी बी रोड येथील मुख्य प्रवेशद्वारासह गाभाऱ्याची चौकट भव्य मिरवणुकीने आणण्यात आली. प्रारंभी चव्हाट गल्ली हद्दीतून चौकट मिरवणुकीला प्रारंभ झाला.

बालाजी मंदिराचा चौकट उभारणी सोहळा मोठया उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष अरुण धमुने हे होते. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले होते.

समोरील चौकटीचे पूजन विश्वास धुराजी व विश्वजित हसबे,दिपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. गाभारा चौकटीचे दीपप्रज्वलन दिगंबर पवार, सुनिल जाधव चंद्रकांत कणबरकर जोतिबा नाईक मोहन किल्लेकर, विनायक मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले .यानंतर चव्हाट गल्लीतील पंच कमिटी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ‘चौकट पूजन’ सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला.मंदिरात विधीवत पूजा, अभिषेक आणि होम-हवन करण्यात आले. मुख्य पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोच्चाराने चौकटीचे पूजन करण्यात आले .

या मंगलप्रसंगी परिसरातील शेकडो भाविकांनी दर्शनासाठी आणि सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गर्दी केली होती. ‘व्यंकटेश स्तोत्र’ आणि ‘गोविंदा-गोविंदा’च्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.चव्हाट गल्लीतील परंपरेनुसार चौकटीला गंध-अक्षता लावून, फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते. हा सोहळा मंदिराच्या पुढील बांधकामाची नांदी मानला जातो.

या सोहळ्यानंतर भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या ट्रस्टतर्फे उपस्थित सर्व मान्यवर आणि भाविकांचे आभार मानण्यात आले. श्री व्यंकटेश मंदिरचे पंच कमिटी अध्यक्ष अरुण धमुणे, लक्ष्मण धमुणे,चंद्रकांत घगणे,राजाराम धमुणे,मोहनसिंग टींबरे,प्रकाश धमुणे,प्रतापसिंह वंटमुरि, दिगंबर धमुणे, गजानन शंकपुरे, व भजनी मंडळचे कार्यकर्ते व महिला युवक उपस्थीत होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!