कौजलगी गावात बँकेची शाखा सुरू करा- खास.जगदीश शेट्टर यांचे केंद्र सरकारला निवेदन

बेलगाम प्राईड/ बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कौजलगी गावात राष्ट्रीयीकृत बँकेची नवी शाखा सुरू करण्याची सातत्यपूर्ण मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या संदर्भात माजी मुख्यमंत्री व खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्र सरकारकडे निवेदन सादर केले आहे.
कौजलगी तसेच परिसरातील कळ्लीगुड्डी, मण्णिकेरी, बिलकुंडी, होनकुप्पी, रडरहट्टी व गोसाबाळ या गावांमध्ये सध्या कोणतीही राष्ट्रीयीकृत बँक उपलब्ध नसल्याने शेतकरी, मनरेगा योजनेतील मजूर, लघुउद्योजक, विद्यार्थी, विधवा महिला तसेच वृद्धापकाळ निवृत्तीवेतनाचे लाभार्थी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कौजलगी गाव हे आपल्या लोकसभा मतदारसंघात येत असून अरबावी विधानसभा मतदारसंघाचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना निर्देश देऊन कौजळगी गावात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्याची शक्यता तपासावी, अशी विनंती शेट्टर यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत बेळगावी लोकसभा मतदारसंघाचे खासदार तसेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांना पाठवण्यात आली आहे.




