Uncategorized
Trending

बेळगावमध्ये “भीमगायन” कार्यक्रमाचे आम. असिफ शेठ यांच्या हस्ते उद्घाटन 

बेलगाम प्राईड/ संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत मोठे आणि महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी भारताच्या सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर क्षेत्रांत मोठे परिवर्तन घडवून आणलेले महान विचारवंत आहेत असे बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार असिफ शेठ यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन महानगरपालिका तसेच वार्ता व जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आंबेडकर उद्यान येथे आयोजित “भीमगायन” कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते.

देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्याच्या उद्देशाने “भीमगायन” कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बेळगाव शहराला भेट दिली असता ते कंग्राळ गल्लीतील एका घरात थांबले होते. आंबेडकरांनी भेट दिलेल्या त्या घराचा विकास करण्यासाठी तसेच आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांची भव्य मूर्ती उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बेळगाव जिल्ह्याला अनेक वेळा भेट दिली आहे. त्या भेटींमुळे दलित समाजाच्या हक्कांसाठी शिक्षणासाठी आणि सामाजिक जागृतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली गेली असे आमदार असिफ शेठ यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

प्रास्ताविकात बोलताना वार्ता व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांनी सांगितले की शिक्षणामुळेच समाजात बदल घडू शकतो. समानता, स्वातंत्र्य आणि समाजाच्या हक्कांची पायाभरणी करून मानवतावादी मूल्यांवर आधारित जीवन जगण्याची प्रेरणा देणारे संविधान शिल्पकार डॉ.बी. आर.आंबेडकर होते. असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!