
बेलगाम प्राईड/ पालक गौरव पुरस्कार २०२५–२०२६ हा कार्यक्रम कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, बेलगाव येथे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पालकांच्या समर्पणाचा व पाठिंब्याचा गौरव या कार्यक्रमातून करण्यात आला.
एकूण ५० पालकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिलेल्या प्रोत्साहन आणि सहकार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील उपक्रम राबविण्यात आले:
• ८ गुणवंत विद्यार्थ्यांना ८ जोड बूट देण्यात आले.
• क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २ विद्यार्थ्यांना नवीन स्पोर्ट्स सायकली देऊन सन्मानित करण्यात आले.
कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळांबद्दल
या संस्था सन १९२० मध्ये स्थापन झाल्या असून सध्या १,६०० हून अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत पुढील शाळा कार्यरत आहेत: कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा, कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी हायस्कूल, कॅन्टोन्मेंट बोर्ड उर्दू माध्यम प्राथमिक शाळा, कॅन्टोन्मेंट बोर्ड उर्दू माध्यम हायस्कूल, कॅन्टोन्मेंट बोर्ड इंग्रजी माध्यम शाळा (CBSE), कॅन्टोन्मेंट बोर्ड स्नेहलय – विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळा या कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली:
मच्छलवार शुभम हरिविजय मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड स्नेहालय कार्याध्यक्ष विजय मोरे कार्याध्यक्ष, निवृत्त सुभेदार, सुधाकर चाळके सचिव हॉकी संघटना बेळगाव निवृत्त लष्कर मानद कॅप्टन उत्तम शिंदे, संतोष दरेकर, अलन मोरे, उपस्थित मुख्याध्यापक फरीदा बिस्ती, अंजुम कौसर चौधरी, प्रशांत बिर्जे मुख्याध्यापक, खादर अमरावती, निशा गावडे, या कार्यक्रमाला शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.
देणगीदारांचे विशेष आभार महेश फाऊडेशनचे महेश जाधव यांनी सायकल भेट दिली.
फेसबुक फ्रेंड सर्कल टीमने संतोष दरेकर गणेश प्रभू आणि स्वाती पोटे यांनी एक सायकल व ८ जोड बूट भेट दिले. तसेच विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाचे मनःपूर्वक आभार मानले.




