Uncategorized
Trending

गुरुपरंपरेला अधिक महत्त्व देणारी मठसंस्था : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

हुन्सूर तालुक्यातील मादहळ्ळी येथे श्री उक्किनकंते मठातील समारंभात वक्तव्य

राज्यातील मठांकडून निःस्वार्थ सेवा

मादहळ्ळी (हुन्सूर) /राज्यातील मठसंस्थांमधून गुरुपरंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. मठ संस्था सरकारप्रमाणेच सामाजिक बांधिलकीने कार्य करत आहेत, असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेंबाळकर  यांनी सांगितले.

मैसूर जिल्ह्या मधील हुनसुर तालुक्यातील मादहळ्ळी येथे आयोजित श्री गुरु बूदिस्वामींच्या ३९७ व्या आराधना सोहळा, ६३ प्रमथांची पूजा, श्रीमठाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन, नूतनीकरण केलेल्या सोळा गाद्या, शतायुषी श्री सिद्धलिंग स्वामी सभागृह तसेच बसवद्वार उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

हुन्सूर तालुक्यातील शांत परिसरात श्रीमठ उभा आहे आणि त्याला सुमारे ७०० वर्षांहून अधिक इतिहास आहे. राज्यात गुरुपरंपरेच्या जतनासाठी उक्किनकंते मठाने महत्त्वाचे योगदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

आपण हवा, पाणी, माती, दगड, झाडे, वनस्पती आणि वाहनांचीही पूजा करतो; परंतु आज माणूस माणसाचा द्वेष करेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजाभिमुख कार्यातून धर्माचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे, असे आवाहन मंत्री Lakshmi Hebbalkar यांनी केले.

मठसंस्थांचे असे कार्य पाहिले की मला माझ्या धर्माचा अभिमान वाटतो. अन्न, शिक्षण, आरोग्य आणि शेती यांसारख्या दासोह सेवांचे कार्य सुरू असल्याचे पाहून आनंद होतो. राजकारणी राजकारणाच्या नावाखाली समाजसेवा करत असतात; परंतु मठसंस्था निःस्वार्थपणे सेवा करत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

आजही आपण गुरूंना अत्यंत मानाचे स्थान देतो. त्रेतायुग आणि द्वापरयुगात गुरू कठोर शिक्षा देत असत; परंतु आजच्या कलियुगात शिक्षकांनाच विद्यार्थ्यांसमोर हात जोडावे लागतात अशी वेळ आली आहे. तरीही अशा काळातही मठसंस्था विविध दासोह सेवा देत आहेत. दुःखी मनांना दिलासा देण्याचे कार्य मठ करत असून सतत सेवा कार्य सुरू आहे. आपण आपल्या धर्माची पूजा करतो आणि इतर धर्मांचा आदर करतो, असे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडत आहे. आतापर्यंत ६२ हजार कोटी रुपये गृहलक्ष्मी स्कीमच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. प्रत्येक लाभार्थ्याला ५४ हजार रुपये देण्यात आले असून याचा मला अभिमान आहे, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.

मादहळ्ळी उक्किनकंते मठाचे श्री सांबसदाशिव स्वामी यांच्या दिव्य सान्निध्यात हा कार्यक्रम झाला. चित्तूर मुक्त  चे जगद्गुरू श्री श्री शिवरात्री देशिकेंद्र महास्वामी, तुमकुर येथील श्री सिद्धलिंग मठाचे परमपूज्य श्री सिद्धलिंग महास्वामी, केंद्रीय मंत्री एच डी कुमारस्वामी हुन्सूरचे आमदार जी. डी. हरीश गौडा, विधान परिषद सदस्य दिनेश गुळिगौडा व सी. एन. मंजेगौडा, माजी मंत्री सा. रा. महेश, माजी आमदार अयनूर मंजुनाथ तसेच अनेक मान्यवर आणि श्री उक्किनकंते मठाचे मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!