Uncategorized
Trending

शांताई’च्या आजींची केंद्राकडून दखल; फिट इंडियाच्या बनल्या प्रमुख पाहुण्या

बेलगाम प्राईड/ शांताई वृद्धाश्रमाच्या सर्व आजींची दखल खुद्द केंद्र सरकारने घेतली असून स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियातर्फे वायझॅक येथे राष्ट्रीय स्तरावरील ‘फिट इंडिया’ या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे पदाचा सन्मान यंदा शांताई वृद्धाश्रमाच्या सर्व आजींना मिळाला असल्याची माहिती वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी दिली.

शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. विजय मोरे म्हणाले जनतेच्या सहकार्यातून चालविली जाणारी शांताई वृद्धाश्रम ही संस्था बेळगावचे भूषण आहे. गेल्या 27 वर्षापासून हा वृद्धाश्रम चालवत असताना वेगवेगळ्या अडचणी आल्या, मात्र त्यावर आम्ही यशस्वीरीत्या मात केली.

या वृद्धाश्रमाचा आम्ही दोन-तीन राज्यांमध्ये प्रचार केला. मात्र कौतुकाची गोष्ट म्हणजे शांताई वृद्धाश्रमाचे नाव सर्व दूर जगप्रसिद्ध करण्याचे काम चेरल मोरे या माझ्या मुलीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून केले आहे. हे काम करत असताना इंडिया गॉट टॅलेंट, सारेगमप वगैरेंसाठी अशा टीव्हीवरील मोठमोठ्या कार्यक्रमातून आमच्या वृद्धाश्रमाच्या सर्व आजी जगभर व्हायरल झाल्या आहेत. याची दखल खुद्द केंद्र सरकारने देखील घेतली आहे.

केंद्राच्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियातर्फे वायझॅक येथे राष्ट्रीय स्तरावरील ‘फिट इंडिया’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी यंदा प्रमुख पाहुणे म्हणून एक मिस इंडिया सौंदर्यवती एक ऑलिम्पिकपटू आणि शांताई वृद्धाश्रमाच्या सर्व आजींना प्रमुख पाहुणे म्हणून, तसेच प्रतिनिधी म्हणून माझी दोन्ही मुलं ॲलन मोरे, चेरल मोरे व सोमानाचे आजी यांना निमंत्रित करण्यात आले होते.

बेळगावसाठी अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे वायझॅक येथे फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत आयोजित सुमारे 10 हजार सायकलपटूंचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील सायकल शर्यतीचे उद्घाटन आमच्या सोमानाचे आजींच्या हस्ते करण्यात आले.

आमच्या संस्थेच्या सदस्यांनी केलेली ही कामगिरी बेळगाव शहरवासियांच्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळेच शक्य झाली आहे असे सांगून विजय मोरे यांनी समस्त शहरवासियांचे मनःपूर्वक आभार मानले. पत्रकार परिषदेस ॲलन विजय मोरे, चेरल मोरे, सोमानाचे आजी यांच्यासह शांताई वृद्धाश्रमाचे इतर सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!