Uncategorized
Trending
कारखान्यातील सर्व विभागाची पहाणी, चन्नराज हट्टीहोळी यांनी कामगारांच्या तक्रारी ऐकून घेतल्या

बेलगाम प्राईड/ नूतन अध्यक्ष चन्नराज हट्टीहोळी यांनी मलप्रभा सहकारी साखर कारखान्याला भेट देऊन कारखान्याच्या प्रत्येक विभागाची पाहणी करून कामकाजाची सर्वविभागाची माहिती घेतली. त्यानंतर कारखान्याच्या कामगारांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
कारखान्याचा विकास, कामगारांचे हित आणि आगामी ऊस हंगामातील व्यवस्थापनाबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली व सर्व विभागांच्या समन्वयाने प्राथमिक तयारी त्वरीत पार पाडण्याचे निर्देश दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी नूतन अध्यक्षांचा सत्कार केला. कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाचे सर्व संचालक यावेळी उपस्थित होते.




